*राष्ट्रीय बंजारा परिषदेने जोपासली सामाजिक बांधीलकी* - अवघा महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना मात्र गोर-गरिबांचे खूप हाल होत आहेत अशा गरजवंताना एक हात मदतीचा म्हणून कारंजा (लाड ) येथील कारंजा मानोरा रोडवरील खुल्या मैदानावर वसाहत करून राहणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या पालावर ..... *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विलास राठोड राष्ट्रीय उपाध्यक्ष*, यांच्या नेतृत्वात , दि १६ एप्रिल 20 रोजी या कोरोना लॉकडाऊन दरम्यान हातावर कमवनाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील गरजवंताना *श्याम राठोड जिल्हा अध्यक्ष, रामराव राठोड कारंजा तालुका अध्यक्ष, आरबीपीचे कार्यकर्ते किसन आडे, पी सी राठोड* यांच्या हस्ते घरपोच पालावर जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी असतांना मुंबई परिसरात लाखो लोकांचे हातावर पोट आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र काम बंद असल्याने त्यांच्या रोजच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोर-गरीब, निराधार, विधवा महिलांना रोजच्या चरितार्थाचा प्रश्न भेडसावत असल्याने ... *बंजारा समाजाचे दानशूर, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड* यांच्याकडून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, बांद्रा, वाशी, वसई, पनवेल, कर्जत, नालासोपारा, घणसोली अश्या ठिकाणी गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात धान्य वाटपाचे काम सुरू आहे. शेकडो आरबीपी चे कार्यकर्ते स्वताची सुरक्षा बाळगत *मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजुन* धान्य वाटपाचे कार्य मोठ्या जोमाने करीत आहे. *लॉक डाऊन मुळे कोनी उपाशी झोपणार नाही* या वाक्या प्रमाने निरंतर कार्य सुरू आहे. आदरणीय *किसनभाऊ राठोड* यांच्या मार्गदर्शनात ...राष्ट्रीय बंजारा परिषदे तर्फे *प्रदेश अध्यक्ष डॉ मोहन चव्हाण नांदेड यांनी लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आज पर्यंत हजारो लोकांना धान्य, किराणा किट, सॅनिटायझर, मास्क, जेवणाचे डब्बे वाटप केले आहे, गोर प्रकाश राठोड सोलापूर, विजय राठोड, गोविंद राठोड, राजु चव्हाण नवी मुंबई, सुमीत राठोड माहूर, अमोल पवार पुणे, कृष्णा चव्हान बुलढाणा, अमोल पवार अंबाजोगाई*, अश्या अनेक ठिकाणी व अनेक जिल्हयात सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यकर्ते धान्य, किराणा किट, वाटपाच्या कामाला लागले आहे. धान्य, किराणा किट, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करतांना त्यांनी गोर-गरिबांना व जनतेला प्रशासनाच्या नियमाचे पालन करा , घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वच्छता राखा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, सोसीयल डीस्टन्सिग पाळा असे आवाहन केले आहे, करीत आहे. कोरानाचा सामना करणाऱ्या *शासन, प्रशासन, डॉक्टर्स, नर्स, पोलीस प्रशासनाचे , सर्व सेक्यूरिटी विभाग व नगर परिषद, महानगर पालिका कर्मचाऱ्यांचे, सेवाभावी संस्थेचे, दानशूर लोकांचे* राष्ट्रीय बंजारा परिषदे तर्फे धन्यवाद व हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. *विलास राठोड,* *राष्ट्रीय उपाध्यक्ष,* *राष्ट्रीय बंजारा परिषद.* April 17, 2020 Read more
जय #गोर_धर्म ...#जय_सेवालाल #राष्ट्रीय_बंजारा_परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष #डॉ_मोहन_चव्हाण यांनी लॉकडाऊन मध्ये #नांदेड येथे अडकलेले दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील 55 ऊस कामगार यांना दोन वेळेस जेवणाची व राहण्याची ची व्यवस्था लॉक डाउन उठेपर्यंत करून दिली व ऊस कामगारांना मोहन भाऊ यांनी असे सांगितले की तुम्ही माझे पाहुणे आहात तुमची पाहूण्यासारखी व्यवस्था करीन पण या ठिकाणी राहून आपण कोरोना ला हरवूया आणि देश जिंकूया असे त्यांच्यासोबत बोलत होते #COVID-19 #Maharashtra #WHO #NGO #INDIA April 17, 2020 Read more