संत श्री डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल अँड क्रिटिकल केअर सेंटर दिग्रस,तसेच वैडूर्यंम् बहुद्देशीय संस्था दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद*
*शिवसेना शहर व तालुका दिग्रस, संत श्री डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल अँड क्रिटिकल केअर सेंटर दिग्रस,तसेच वैडूर्यंम् बहुद्देशीय संस्था दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद* शुक्रवार दि.२७ मार्च २०२० रोजी आयोजित आरोग्यधाम हॉस्पीटल, दिग्रस येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता, सर्वत्र बंद ची परिस्थिती असतांना सुद्धा जबरदस्त प्रतिसाद देत १५४ जणांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे पवित्र कार्य केले.विषेश करून युवती व स्त्रियांनी या शिबीरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शिबीराच्या सुरुवातीस रक्त साठवण बॅगा संपल्याने नवीन बॅगा बोलावणे भाग पडले, तरीही रक्तदाते रांगेत तिष्ठत उभे राहिले, परंतु 'रक्तदान करायचा निर्धार मनाशी ठाम असल्याने' रक्तदान केल्याशिवाय जाणारच नाही असा चंगच जणू सर्वांमध्ये पहावयास मिळाला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन विविध स्तरातून रक्तदान शिबिरांचे आयोजन होणे गरजेचे आहे.याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेने दिग्...