संत श्री डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल अँड क्रिटिकल केअर सेंटर दिग्रस,तसेच वैडूर्यंम् बहुद्देशीय संस्था दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद*
*शिवसेना शहर व तालुका दिग्रस, संत श्री डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल अँड क्रिटिकल केअर सेंटर दिग्रस,तसेच वैडूर्यंम् बहुद्देशीय संस्था दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद*
शुक्रवार दि.२७ मार्च २०२० रोजी आयोजित आरोग्यधाम हॉस्पीटल, दिग्रस येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता, सर्वत्र बंद ची परिस्थिती असतांना सुद्धा जबरदस्त प्रतिसाद देत १५४ जणांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे पवित्र कार्य केले.विषेश करून युवती व स्त्रियांनी या शिबीरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शिबीराच्या सुरुवातीस रक्त साठवण बॅगा संपल्याने नवीन बॅगा बोलावणे भाग पडले, तरीही रक्तदाते रांगेत तिष्ठत उभे राहिले, परंतु 'रक्तदान करायचा निर्धार मनाशी
ठाम असल्याने' रक्तदान केल्याशिवाय जाणारच नाही असा चंगच जणू सर्वांमध्ये पहावयास मिळाला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन विविध स्तरातून रक्तदान शिबिरांचे आयोजन होणे गरजेचे आहे.याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेने दिग्रस येथे सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते.आरोग्यधाम हॉस्पीटल येथे 'रक्त साठा केंद्र Blood Storage Unit' सुरू झाले असून, आता आठवड्यातील सातही दिवस २४ तास या ठिकाणी गरजवंतांना रक्त उपलब्ध होणार असून, याचा लाभ दिग्रस व परिसरातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.सदर रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्भवसाहेब ठाकरे यांच्या आव्हाहनानुसार तसेच पालकमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या आदेशान्वये आयोजित करणात आले असून, सदर शिबीर आरोग्यधाम हॉस्पीटल चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.प्रशांत रोकडे (जनरल सर्जन) यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. शिबिरास शिवसेनेचे दिग्रस शहर व तालुक्यातील समस्त पदाधिकारी तथा नगरसेवक आणि आरोग्यधाम हॉस्पीटल चे संचालक डॉ.श्याम जाधव (स्त्रीरोग तज्ञ), डॉ.संदीप दुधे (प्रशासकीय संचालक), डॉ.आशिष शेजपाल
(एम.डी. मेडिसीन), डॉ.श्रीकृष्ण पाटील (एम.एस.शल्य),
डॉ.सौ.कल्पना श्याम जाधव (स्त्रीरोग तज्ञ) व डॉ.सौ.अल्फा प्रशांत रोकडे यांची उपस्थिती होती.रक्तसंकलणाचे कार्य यवतमाळ येथील एकनील ब्लड बँक च्या चमूने केले तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी अजिंक्यभाऊ म्हात्रे, केतन रत्नपारखी, बालू जाधव, राहुल देशपांडे, विनायक दुधे, संजय इकडे, व संदीप रत्नपारखी तथा समस्त शिवसैनिक व आरोग्यधाम हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.आरोग्यधाम हॉस्पीटल तर्फे अनेकदा अश्या सामाजिक उपक्रमांचे, आरोग्यशिबिरांचे,रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, तळागाळातील लोकांना याचा लाभ मिळत आहे.' शेवटी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ' हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन हॉस्पीटल वाटचाल करत आहे.
Comments
Post a Comment