ठाणे : पुढारी वृत्तसेवा
असं म्हणतात की, शून्यातून साम्राज्य निर्माण करणारे व्यक्ती शून्यापासून सुरू झालेला आपला प्रवास कधीही विसरत नाहीत. आपल्या यशाची उंची व्यक्त करणाऱ्या संख्येची किंमत एक एक वाढत जाणाऱ्या शून्यामुळेच अबाधित आहे याची त्यांना पुरेपूर जाण असते. सहाजिकच अशी शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे माणुसकी आणि नैतिकतेशी आयुष्यभर जोडलेली असतात. शून्यातून स्वबळावर उद्योजकतेचं आपलं एक स्वतंत्र साम्राज्य उभे करणारे आणि मानवतावाद हे आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे अशी वैचारिकता समाजात रूढ करणारे असेच एक असाधारण व्यक्तिमत्व म्हणजे *गोर धर्म प्रचारक तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठोड...!*
कोरोनाच्या बिकट प्रसंगात राष्ट्रीय बंजारा परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किसनराव राठोड यांनी देशव्यापी मदतकार्य राबवून सामाजिक बांधिलकी हाच मानवतेचा खरा आधार आहे हे अधोरेखित केले आहे. किसनराव राठोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बंजारा परिषदेने आता पर्यंत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यातील सुमारे *एक लाखाहून** अधिक गरजू व गोरगरीब लोकांना अन्नधान्य, अन्नपदार्थ, जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत पोहचवण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. त्याच बरोबर कोरोनायुध्दात लढणारे पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांना सुरक्षा साधने, सॅनिटाईजर यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश पोलीस स्टेशन, वृद्धाश्रम यांचे निर्जंतुकीकरण केले आहेत. इतकेच नव्हे तर किसनराव राठोड यांनी स्वखर्चातून उभे केलेले वाशीम जिल्ह्यातील पोहरागड येथील *गोर बंजारा धर्मपीठ व भक्तीधाम* लोधीवली मुंबई येथील *गोर बंजारा ज्ञानपीठ,* अथणी बेळगाव येथील बंजारा तीर्थक्षेत्र, अक्कलकोट सोलापूर येथील *बंजारा शांतीस्थळ* या सर्व वास्तू विलगिकरणासाठी खुल्या करून दिल्या आहेत. या विलगिकरण केंद्राचा संपूर्ण खर्चाचा आर्थिक भार किसनराव यांनी स्वीकारला आहे. आध्यात्मिकता, परिश्रम, नैतिकता आणि मानवतावाद या चार मजबूत वैचारिक स्तंभावर आधारित गोर धर्म व संघटन चळवळ उभी करणारे किसनराव म्हणूनच या कठीण काळात एक अद्वितीय कोरोनयोद्धा ठरत आहेत.
किसनराव राठोड एक योद्धा
असाधारण अभ्यासू स्वभाव, तळागाळातील माणसांशी असलेली आपुलकी, आध्यात्मिक विचारशैली आणि मातृत्व संस्काराने संपन्न असलेले बंजारा समाजातील यशस्वी उद्योजक म्हणून किसनराव राठोड यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. गोरगरीब लोकांना सढळ हाताने मदत करणारा हा उद्योजक सदैव सामाजिक बांधिलकी जपून आहे. वर्षभर गरिबांना अन्नदान करण्यासाठी अन्नछत्र उभारणी करण्यापासून तर गरीब विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी स्वीकारण्या पर्यंत, गरिबीच्या ओझ्याखाली दबलेल्या पित्यांच्या खांद्यावरील भार आपल्या खांद्यावर घेऊन शेकडो मुलामुलींचे सामूहिक विवाह सोहळा आयोजन करण्यापासून तर वृद्धाश्रमातील असंख्य माता पित्यांना संभाळण्याइतपत सर्वच कार्य त्यांच्या हातून घडलेली आहेत. पुण्यकर्म आणि भक्तिमार्ग हाच जीवनातील खरा आनंद मिळवण्याचा राजमार्ग आहे, असा अनुभव संपन्न विचार त्यांच्या ठायी असल्याने त्यांनी आजतोवर अनेक सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक धरोहर मजबूत करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन एकहाती आर्थिक भार सांभाळत संपन्न केले आहेत.
ज्या समाजात जन्मास आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन किसनराव यांनी गोर बंजारा धर्मपीठ, भक्तीधाम, पोहरादेवी, गोर बंजारा ज्ञानपीठ,लोधीवली, मुंबई गोर बंजारा तीर्थक्षेत्र अथणी बेळगाव, सेवाधाम, बीड, सामकीयाडी शक्तीपीठ उमरी वाशीम, शांती स्थळ, अक्कलकोट ...सात ऐतिहासिक स्थळांची स्थापना व निर्मिती केली आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी एका प्रभावी माध्यमाची गरज असते हे ओळखून त्यांनी गोर धर्म चळवळ हाताशी सक्रीय करून राष्ट्रीय राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेची स्थापना केली त्या माध्यमातून एक सामाजिक चळवळ उभी केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून देशव्यापी मदत कार्य किसनराव करीत असतात. एकीकडे राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून दीन-दलित ,गोर गरीब लोकांना प्रचंड प्रमाणात मदत पोहचवण्याचे कार्य सुरू असतांनाच योग्यता असून देखील भांडवलशाहीमुळे बेरोजगारीच्या जाळ्यात अडकलेल्या शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर किसनराव यांनी भर दिला आहे. हातपाय जोडून फुकटचे मूठभर मिळवण्यापेक्षा मेहनत करून मणभर मिळवणे सर्वोत्कृष्ट ठरते अशी त्यांची पक्की धारणा त्यांच्या स्वभावातून झळकते. साहजिकच त्यांच्याकडे मदतीची याचना घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीस तात्पुरत्या स्वरूपात मदत करण्यापेक्षा गरजवंतास कायमस्वरूपी आत्मनिर्भर करण्यावर त्यांचा संपूर्ण भर असतो. क्षणिक मदत काही वेळेनंतर संपुष्टात येते परंतु आत्मनिर्भतेसाठी केलेली मदत निरंतर काळ टिकते असे त्यांचे ठाम मत आहे.
#KDRATHOD
#kdrathodgrp
#COVID-19
#Maharashtra
#Gormatikatta
#gorbanjarayouthrightsfighter
Comments
Post a Comment