ठाणे : पुढारी वृत्तसेवा असं म्हणतात की, शून्यातून साम्राज्य निर्माण करणारे व्यक्ती शून्यापासून सुरू झालेला आपला प्रवास कधीही विसरत नाहीत. आपल्या यशाची उंची व्यक्त करणाऱ्या संख्येची किंमत एक एक वाढत जाणाऱ्या शून्यामुळेच अबाधित आहे याची त्यांना पुरेपूर जाण असते. सहाजिकच अशी शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे माणुसकी आणि नैतिकतेशी आयुष्यभर जोडलेली असतात. शून्यातून स्वबळावर उद्योजकतेचं आपलं एक स्वतंत्र साम्राज्य उभे करणारे आणि मानवतावाद हे आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे अशी वैचारिकता समाजात रूढ करणारे असेच एक असाधारण व्यक्तिमत्व म्हणजे *गोर धर्म प्रचारक तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठोड ...!* कोरोनाच्या बिकट प्रसंगात राष्ट्रीय बंजारा परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किसनराव राठोड यांनी देशव्यापी मदतकार्य राबवून सामाजिक बांधिलकी हाच मानवतेचा खरा आधार आहे हे अधोरेखित केले आहे. किसनराव राठोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बंजारा परिषदेने आता पर्यंत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यातील सुमारे *एक लाखाहून** अधिक गरजू व गोरगरीब लो...