कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी असताना भांईदर मधील शेकडो लोकांचे हातावर पोट आहे. मात्र कोरोनामुळे सर्वत्र काम बंद असल्याने त्यांचा रोजच्या खाण्या-पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गोर - गरीब, निराधार, रोजच्या चरितार्थाचा प्रश्न भेडसावत असल्याने *राष्ट्रीय बंजारा परीषद* तर्फे धान्य वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे भांईदर येथे काम बंद असल्याने ऱाई,मुर्धा,नेहरुनगर,शास्त्रीनगर रोजदारीवर बांधकाम लेबर मजुराना हा मदतीचा हात आहे. नेहमीच गरिबांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या * राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनभाऊ राठोड* यांनी गोरगरीब व असाह्य लोकांना मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे श्री नामदेवभाऊ चव्हाण व राजु राठोड,गणेश चव्हाण व गोरशक्ती फांऊडेशन संपुर्ण टिम यांनी गोरगरिबांना धान्य किट वाटप करण्यात मोलाचे सहकार्य केले या बाबतची माहिती गोर नामदेव चव्हाण भांईदर यांनी दिली.