आज आपल्या देशावरच नव्हे तर संपूर्ण विश्वावर कोरोना नावाचे महा भयंकर संकट आले आहे. संपूर्ण देश आर्थिक अडचणीत सापडले असून , परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. प्रत्येक नागरिक भयभीत वातावरणात दैनंदिन जीवन जगत आहे. आपले महामहिम पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी साहेब , आपले मुख्यमंत्री श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला आपल्याच घरी थांबा व सुरक्षित रहा असे आवाहन करीत आहे. डॉक्टर्स, नर्स, पोलीस आपले कर्तव्य जिवाची पर्वा न करता चोख पार पाडत आहे. अश्यातच बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील गोर बंजारा धर्मपीठ, आदरणीय भगवंत सेवक किसनभाऊ राठोड निर्मित "भक्तीधाम" येथे शासनाच्या आरोग्यविभागाला मदत व्हावी या हेतुने कोरोना संशयित रुग्णांच्या मदतीसाठी 40 रूम्स विलगिकरनासाठी व 10 रूम्स कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आराम करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत त्यांनी त्यांच्या कंपनीतील 3,500 कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे आदेश दिले असून सुट्टी...