मुख्यमंत्री श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला आपल्याच घरी थांबा व सुरक्षित रहा असे आवाहन करीत आहे.
आज आपल्या देशावरच नव्हे तर संपूर्ण विश्वावर कोरोना नावाचे महा भयंकर संकट आले आहे. संपूर्ण देश आर्थिक अडचणीत सापडले असून , परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. प्रत्येक नागरिक भयभीत वातावरणात दैनंदिन जीवन जगत आहे.
आपले महामहिम पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी साहेब , आपले मुख्यमंत्री श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला आपल्याच घरी थांबा व सुरक्षित रहा असे आवाहन करीत आहे. डॉक्टर्स, नर्स, पोलीस आपले कर्तव्य जिवाची पर्वा न करता चोख पार पाडत आहे.
अश्यातच बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील गोर बंजारा धर्मपीठ, आदरणीय भगवंत सेवक किसनभाऊ राठोड निर्मित "भक्तीधाम" येथे शासनाच्या आरोग्यविभागाला मदत व्हावी या हेतुने कोरोना संशयित रुग्णांच्या मदतीसाठी 40 रूम्स विलगिकरनासाठी व 10 रूम्स कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आराम करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत त्यांनी त्यांच्या कंपनीतील 3,500 कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे आदेश दिले असून सुट्टीच्या काळात त्यांना घरबसल्या पगारसुध्दा देन्याचे सांगितले आहे. जवळपास प्रत्येकी 20 हजारा पासून तर 3 लाखांपर्यन्त कर्मचाऱ्यांना पगार दयावा लागतो. हा आर्थिक भुर्दंड सहन करीत शासनाला मदतीचा हात त्यांनी सरसावला आहे. अश्या आर्थिक आणीबाणी मध्ये अनेक उद्योजक आपल्या कर्मचाऱ्यांना घरबसल्या पगार देत आहेत, काहींचे उद्योग धंदे बंद पडण्याच्या स्थितीत आले आहे, अश्या व्यापाऱ्यांना करातून सूट द्यावी अशी मागणी सुध्दा उद्योजक किसनराव राठोड यांनी आदरणीय पंतप्रधान व महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
Happy Onam to everyone celebrating. May your lives be filled with peace, happiness and joy 🙏🙏 . . . #happyonam2020 #gorbanjarayouthrightfighters #yrrathod #India #keralaonam #festival
Comments
Post a Comment